Latest Post


 
 निजामपुर हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

 सांगोला प्रतिनिधी
 शिक्षण संस्था चालवताना येणाऱ्या असंख्य अडचणी आणि आव्हानांना तोंड देऊन निजामपूर सारख्या ग्रामीण भागात माळरानावर शिक्षण संस्था उभारून गेल्या अनेक वर्षांपासून आपले काम प्रामाणिकपणे आणि अविरतपणे पार पाडून संस्था अध्यक्ष गुलाबराव बाबर व संस्थेचे सचिव सुखदेव लवटे या दोन परिवारांनी आगामी पिढीसमोर त्याग आणि समर्पणाचा वेगळा आदर्श घालून दिला असल्याचे प्रतिपादन  श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साजीकराव पाटील यांनी केले. काल रविवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निजामपुर तालुका सांगोला येथे राजे संभाजी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ संचलित निजामपुर हायस्कूल निजामपूर या प्रशालेच्या नूतन वास्तूचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कै महादेवआबा लवटे फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ पाटील बोलत होते 
 या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे मा नगरसेवक प्रा संजय देशमुख जालना महापालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर सांगोल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने वैद्यकीय अधिकारी डॉ पियुष साळुंखे-पाटील सुप्रसिद्ध वक्ते माणिकराव पाटील माजी सरपंच संदिपान लवटे तानाजी लवटे हनमंतगावचे माजी सरपंच आप्पासाहेब खांडेकर यशवंत शिंदे प्रकाश बाबर धर्मराज बाबर पत्रकार किशोर म्हमाणे मिनाज खतीब सुरज लवटे निसार तांबोळी समीर पाटील आदींसह पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि निजामपुर गावातील पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक व तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
 पुढे बोलताना डॉ पाटील म्हणाले कै महादेव आबा लवटे यांनी हयात असताना शाळेच्या बांधकामासाठी दिलेली सुमारे दोन एकर जागा त्यांच्या नंतरही लवटे कुटुंबीयांनी संस्थेला दिली ही बाब फार उल्लेखनीय आणि अभिमानाची आहे त्या पाठीमागील त्यांची त्यागाची व समर्पणाची भावना निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे याशिवाय संस्था स्थापन करून आजपर्यंत अध्यक्ष गुलाबराव बाबर यांनी ही अगदी निष्ठा आणि सचोटीने ग्रामीण भागात शिक्षणाचे बीज रोवले व खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा गावात दारोदारी पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे बाबर व लवटे परिवारांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून अगदी एकदिलाने त्याग आणि समर्पण या भावनेतून जे काम केले आहे ते निश्चितच तरुणांसाठी आदर्शवत आहे यापासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असेही ते शेवटी म्हणाले 
 उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांनी या प्रशालेच्या पायाभरणी समारंभात पासून ते उद्घाटना पर्यंतच्या प्रवासाचा आपण साक्षीदार असल्याचे सांगत संस्था आणि प्रशालेतील शिक्षकांचे कौतुक केले त्याशिवाय त्यांनी नूतन इमारत उभा करत असताना ज्यांनी मदत केली त्यांनाही विशेष धन्यवाद देत ज्यावेळी या संस्थेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी निश्‍चितच मदत करणाऱ्यांची नावे त्यामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरली जातील असेही नमूद केले यावेळी संतोष खंडेकर इनामदार माणिकराव पाटील व विनायक कुलकर्णी आदि  वक्त्यांनी ही आपली मनोगते व्यक्त करताना कै महादेव आबा लवटे फाउंडेशन च्या कार्याचा गौरव करीत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 यावेळी निजामपुर चे माजी सरपंच कै महादेव आबा लवटे यांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 मान्यवरांना कै महादेवआबा लवटे फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये आदर्श सरपंच म्हणून अचकदाणी चे वसंतराव पाटील आदर्श माता म्हणून चांदबी अजीज इनामदार निजामपुर भूषण म्हणून उमेश कोळेकर ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गुलाबराव पाटील सामाजिक क्षेत्रातून विनायक कुलकर्णी संजय बनसोडे यांना तर आदर्श शिक्षक म्हणून तानाजी पारसे रेवणसिद्ध कोकरे चंद्रकांत भोरे कालिदास मुंढे कैलास होवाळ व स्वाती नीलकंठ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष सुखदेव लवटे यांनी सूत्रसंचालन विकास शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अण्णासाहेब गायकवाड यांनी केले
 काल रविवारी दिवसभर तीन सत्रात चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये पहिल्या सत्रात शास्त्रोक्त पूजा दुसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण व प्रशालेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तर तिसर्‍या आणि शेवटच्या सत्रात प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला




 वडिलांच्या आदर्शाचा वारसा जोपासणार

 सार्वजनिक जीवनात कसे जगावे याचा आदर्श घालून देणाऱ्या कै महादेव आबा लवटे यांनी दाखविलेल्या मार्गावरून यापुढील काळातही मार्गक्रमण करून फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील काळातही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करणार
 सुखदेव लवटे अध्यक्ष कै महादेवआबा लवटे फाउंडेशन
 सचिव राजे संभाजी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ निजामपूर


राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना निवडणुकांची लगीनघाई झाल्याचेच दिसून येते आहे. कारण साताऱ्यातील पाटणमध्ये बोलताना ते म्हटले की महिन्याभरात माझं लग्न आहे. काही महिन्यांनी सगळ्यांचंच लग्न आहे, तेव्हा अक्षता टाका संपल्या म्हणू नका. असं उदयनराजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहात म्हटले तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. लग्न हा शब्द त्यांनी भाषणात निवडणुकीच्या अनुषंगानेच वापरला आहे. मार्च महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने उदयनराजे यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांचे हे वक्तव्य ऐकताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरुन कौतुक केले. महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेण्याचे धाडस सत्तेत असताना दाखवले आहे तसे कोणीही दाखवले नाही असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. लोकनेते म्हणावेत असे खूप कमी नेते आहेत, समाजाची जाणीव असणारे खूप कमी नेते सध्या उरले आहेत असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. शंभूराजे देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले एकाच मंचावर होते.
याच कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी शंभूराजे देसाईंचेही कौतुक केले. महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक साताऱ्यात उभारण्यात आलं त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. याच कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी सरकारचं भरभरुन कौतुक केलं.  शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 


 



अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना केली मदत !  
सांगोला (प्रतिनिधी)
आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य ऋषिकेश म्हेत्रे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पुणे येथे फर्ग्यूसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देवून आपुलकीचे दर्शन घडविले आहे.
सांगोला येथे गेल्या महिन्यात सुरु करण्यात आलेल्या ‘आपुलकी प्रतिष्ठान’चे सदस्य ऋषिकेश राजेंद्र म्हेत्रे यांचा 6 फेबु्रवारी रोजी वाढदिवस होता. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगळा उपक्रम राबवून  वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांनी आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातील दोन गरीब व होतकरु अशा विद्यार्थ्यांना 5 हजार रुपयांची मदत 6 फेबु्रवारी रोजी सायंकाळी आपुलकीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष लऊळकर सर यांच्याकडे सुपूर्त केली. 
यावेळी बोलताना सुभाष लऊळकर सर म्हणाले की, मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाने सामाजिक भान जपणे गरजेचे असते. ऋषिकेश म्हेत्रे यांनी तरुण वयातच सामाजिक बांधिलकी जोपासून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन एक चांगली सुरुवात केलेली आहे. ही सुरवात नक्कीच कौतुकास्पद अशी आहे. सामाजिक कार्यात तसेच गोरगरीब लोकांसाठी आपुलकी दाखविण्याचे कार्य आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु झाले आहे. अशा या चळवळीत सर्व स्तरातील लोकांनी  सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी ऋषिकेश म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त शाल, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आपुलकीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

##आपुलकीची अशीही मदत - पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या दोन हुषार विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपलुकी प्रतिष्ठानच्या दहा सदस्यांनी एकत्र येवून प्रत्येकी 2500 रुपये दरमहा शैक्षणिक व इतर खर्चासाठी देण्याचा संकल्प केला असून 1 फेबु्रवारी पासून त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे.



नाझरे-(वार्ताहर ) मौजे नाझरे येथील श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरे येथे सन 2018 मध्ये  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एन. एम. एम. एस.) मध्ये दैदिप्यमान यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली. प्रशालेतील गुणवंत विद्यार्थीचा पालकसमवेत सत्कार प्राचार्य श्री प्रकाशराव परिचारक व पर्यवेक्षिका श्रीमती यास्मिन मुल्ला यांच्या हस्ते संपन्न झाला.प्रशालेचे गुणवंत विद्यार्थी पवार सुशांत हणमंत, 
कु. परिहार सोनिया विशाल, कु. पवार साक्षी अनिल, कु.ढोबळे आकांक्षा शत्रुघ्न,कु. भिवरे सानिया प्रशांत
 हे पाच विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
 या प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी 12,000 रुपये प्रमाणे पुढील चार वर्षासाठी एकूण 48,000 रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहेत. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्राचार्य श्री. प्रकाशराव परिचारक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच पालक श्री. हणमंत पवार यांनी आपल्या मनोगतातून प्रशालेतील शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक श्री शिवभूषण ढोबळे सर यांनी केले.
 या प्रसंगी पालक श्री. हणमंत पवार, सौ. गीता परिहार, श्री. शत्रुघ्न ढोबळे, श्री. अनिल पवार, श्री. प्रशांत भिवरे हे उपस्थित होते. सदर विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्षा श्रीमती. रुद्रम्मा पाटील, उपाध्यक्षा यमुनाताई पाटील व संस्था सचिव श्री मुकुंदराव पाटील सर यांनी कौतुक केले.
 वरील गुणवंत विद्यार्थ्यांना श्रीमती डांगे मॅडम, श्री सिद्धार्थ मोटे सर, श्री. दत्तात्रय पाटील सर, श्री. मच्छिंद्र बाबर सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
 या कार्यक्रम प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




४ वर्षात  रु. ३ लाख ३६ हजार  शिष्यवृत्ती मिळणार 

घेरडी (वार्ताहर ) :   राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन.एम.एम.एस.) घेरडी ता.सांगोला येथील जवाहर विद्यालयाचे सात विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. एन.एम.एम.एस परीक्षा गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून गुणवत्ता प्राप्त प्रत्येक विद्यार्थ्यांला इ. ९ वी ते १२ वी पर्यंत प्रतिवर्षी रु. १२ हजार प्रमाणे ४ वर्षात  रु. ३ लाख ३६ हजार  शिष्यवृत्ती मिळणार आहे.
        दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.जवाहर विद्यालयाचे शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे
:  (१)  समाधान लक्ष्मण सावंत     (२) ओंकार धोंडीबा शिंगाडे    (३)  संदेश शंकर कुंभार  (४) अनिकेत विठ्ठल कुंभार     (५) विजय हरिश्चंद्र गेंड  (६) आरजू फिरोज तांबोळी  (७) सानिका शंकर जगधने 
         जवाहर विद्यालयाची विविध स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याची यशस्वी परंपरा याही वर्षी कायम राखण्यात आली . गुणवंत
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक मनोजकुमार माने यांचेसह  , एस. पी खुळपे , जी.के. गोरड ,व्ही.बी. त्रिगुणे , ई.जे. जहागीरदार  यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत    विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्षा सौ.गीतांजली डोंगरे , उपाध्यक्ष डी.वाय. कुलकर्णी, संस्था सचिव उमेश डोंगरे ,संस्था सदस्य जयंत डोंगरे ,मुख्याध्यापक धनंजय डोंगरे,पर्यवेक्षक मनोजकुमार माने यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


सांगोला -
शिक्षणानंतर नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वाटेने गेलेले मित्र जवळपास 40 ते 43 वर्षांनी एकमेकांची गळाभेट घेवून भेटण्यात धन्यता मानत होते तर गतस्मृतींना उजाळा देताना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचा अनुभव शनिवारी सांगोल्यात आला. सांगोल्यातील कविराज मंगल कार्यालयात हे मित्र एकमेकांना भेटून आपल्या सुख-दु:खाच्या गोष्टी एकमेकांना सांगण्यात दंग झाले होते. निमित्त होते विद्यार्थी आणि गुरुजनांच्या स्नेहमेळाव्याचे! 
1975 साली दहावी व 1977 साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना शिकविणार्‍या गुरुजनांचा स्नेहमेळावा शनिवारी कविराज मंगल कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी काही मित्र तर चक्क 40 वर्षांनी एकमेकांना भेटत होते. सांगोल्यातील सांगोला विद्यामंदिर प्रशाला व न्यू इंग्लिश स्कूल या दोन्ही प्रशालेतील सांगोल्यात स्थायिक असलेल्या कांही मित्रांनी आपल्या बॅचचे विद्यार्थीदशेतील मित्र एकत्र आणण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. जवळपास महिनाभर तयारी करुन सर्वच मित्रांचे फोन नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधून या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे शनिवारी 2 फेबु‘वारी रोजी हा स्नेहमेळावा पार पडला. आजपर्यंत सांगोल्यात फक्त विद्यार्थ्यांचे ‘गेट टुगेदर’ अनेकवळा पार पडले आहे परंतु या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य असे की,  विद्यार्थ्यांनी एकत्र येवून आपल्या गुरुजनांनाही एकत्र बोलावून त्यांच्याविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा यथोचित असा सन्मान केला. 
या स्नेहमेळाव्याप्रसंगी अनेक गुरुजनांनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांविषयी आपले असणारे प्रेम व्यक्त केले. प्रतिमा कुलकर्णी, डी.डी.जगताप, एम.डी.बनकर, सं.ग.पवार, भुजंगराव कांबळे, म.सि.झिरपे, विठ्ठलराव िंशदे, प्रबुध्दचंद्र झपके यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा देत गतस्मृती जागवल्या. या स्नेहमेळाव्याला 1975 च्या दहावी बॅचचे दोन्ही प्रशालेचे जवळपास 60 ते 70 विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे जवळपास 20 ते 25  गुरुजन उपस्थित होते. दुपारी स्नेहभोजनानंतर सर्वांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. शनिवारी दिवसभर विविध कार्यक‘मांनी साजरा करण्यात आलेला हा स्नेहमेळावा व त्यातून मिळालेला आनंद  हा अविस्मरणीय असल्याचा अभिप्राय यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच मित्रपरिवाराने व गुरुजनांनी समारोपप्रसंगी दिला. या स्नेहमेळाव्याचे आयोजन दीपक चोथे, अरुण पाटील, तानाजी घाडगे, प्रा. राजेंद्र ठोंबरे व मित्रपरिवाराने केले होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget