आपल्या भाषणात उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरुन कौतुक केले. महाराष्ट्राला एक चांगला मुख्यमंत्री लाभला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेण्याचे धाडस सत्तेत असताना दाखवले आहे तसे कोणीही दाखवले नाही असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे. लोकनेते म्हणावेत असे खूप कमी नेते आहेत, समाजाची जाणीव असणारे खूप कमी नेते सध्या उरले आहेत असेही उदयनराजेंनी म्हटले आहे. शंभूराजे देसाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले एकाच मंचावर होते.
याच कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी शंभूराजे देसाईंचेही कौतुक केले. महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक साताऱ्यात उभारण्यात आलं त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. याच कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांनी सरकारचं भरभरुन कौतुक केलं. शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
Post a Comment