स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने 40 वर्षानंतर एकत्र आलेल्या   विद्यार्थी आणि गुरुजनांनी दिला गतस्मृतींना उजाळा!


सांगोला -
शिक्षणानंतर नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वाटेने गेलेले मित्र जवळपास 40 ते 43 वर्षांनी एकमेकांची गळाभेट घेवून भेटण्यात धन्यता मानत होते तर गतस्मृतींना उजाळा देताना त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचा अनुभव शनिवारी सांगोल्यात आला. सांगोल्यातील कविराज मंगल कार्यालयात हे मित्र एकमेकांना भेटून आपल्या सुख-दु:खाच्या गोष्टी एकमेकांना सांगण्यात दंग झाले होते. निमित्त होते विद्यार्थी आणि गुरुजनांच्या स्नेहमेळाव्याचे! 
1975 साली दहावी व 1977 साली बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना शिकविणार्‍या गुरुजनांचा स्नेहमेळावा शनिवारी कविराज मंगल कार्यालयात घेण्यात आला. त्यावेळी काही मित्र तर चक्क 40 वर्षांनी एकमेकांना भेटत होते. सांगोल्यातील सांगोला विद्यामंदिर प्रशाला व न्यू इंग्लिश स्कूल या दोन्ही प्रशालेतील सांगोल्यात स्थायिक असलेल्या कांही मित्रांनी आपल्या बॅचचे विद्यार्थीदशेतील मित्र एकत्र आणण्यासाठी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. जवळपास महिनाभर तयारी करुन सर्वच मित्रांचे फोन नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधून या स्नेहमेळाव्याचे निमंत्रण दिले होते. त्याप्रमाणे शनिवारी 2 फेबु‘वारी रोजी हा स्नेहमेळावा पार पडला. आजपर्यंत सांगोल्यात फक्त विद्यार्थ्यांचे ‘गेट टुगेदर’ अनेकवळा पार पडले आहे परंतु या स्नेहमेळाव्याचे वैशिष्ट्य असे की,  विद्यार्थ्यांनी एकत्र येवून आपल्या गुरुजनांनाही एकत्र बोलावून त्यांच्याविषयी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा यथोचित असा सन्मान केला. 
या स्नेहमेळाव्याप्रसंगी अनेक गुरुजनांनी आपल्या भावना व्यक्त करताना विद्यार्थ्यांविषयी आपले असणारे प्रेम व्यक्त केले. प्रतिमा कुलकर्णी, डी.डी.जगताप, एम.डी.बनकर, सं.ग.पवार, भुजंगराव कांबळे, म.सि.झिरपे, विठ्ठलराव िंशदे, प्रबुध्दचंद्र झपके यांनी आपले मनोगत व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा देत गतस्मृती जागवल्या. या स्नेहमेळाव्याला 1975 च्या दहावी बॅचचे दोन्ही प्रशालेचे जवळपास 60 ते 70 विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे जवळपास 20 ते 25  गुरुजन उपस्थित होते. दुपारी स्नेहभोजनानंतर सर्वांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. शनिवारी दिवसभर विविध कार्यक‘मांनी साजरा करण्यात आलेला हा स्नेहमेळावा व त्यातून मिळालेला आनंद  हा अविस्मरणीय असल्याचा अभिप्राय यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच मित्रपरिवाराने व गुरुजनांनी समारोपप्रसंगी दिला. या स्नेहमेळाव्याचे आयोजन दीपक चोथे, अरुण पाटील, तानाजी घाडगे, प्रा. राजेंद्र ठोंबरे व मित्रपरिवाराने केले होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget