आरोपीला लवकरात लवकर अटक झाली पाहिजे-निवेदनाद्वारे मागणी

सांगोला प्रतिनिधी : करपेेवाडी घटनेतील आरोपीला अटक झालीच पाहिजे, अशा विविध घोषणा देत शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधवांनी तहसिल कार्यालया समोर कु. भाग्यश्री माने हत्येचा निषेध नोंदवला. करपेेवाडी ता. पाठण जि. सातारा येथील नाभिक कुटूंंबातील इयत्ता 12 वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. भाग्यश्री माने या शालेय विद्यार्थिनीची अत्यंत निदर्यीपणे गळा चिरून हत्या करण्यात आली.

या घटनेच्या निषेधार्थ काल शनिवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सांगोला आदर्श नाभिक सेवा मंडळाच्यावतीने निवेदनाद्वारे निषेध नोंदवला. यावेळी बहुजनांचे नेते बापूसाहेब ठोकळे व संभाजी ब्रिगेडचे नेते अरविंदभाऊ केदार यांनी आपला पाठिंबा देत निषेध नोंदवला. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शालेय विद्यार्थिनींच्या हत्या होत आहेत. यामधील संबंधित आरोपी मोकाट खुलेआम फिरत आहेत. याबाबत पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलणे गरजेचे आहे. मात्र करपेेवाडी येथे विद्यार्थिनी हत्येच्या घटनेला 10 दिवस उलटून गेले तरी आरोपींना पकडण्यात तेथील पोलिस प्रशासनास यश आले नाही. या घटनेच्या निषेधार्थ सकल नाभिक संघटना, महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळ, सांगली जिल्हा संघटना अशा विविध सामाजिक संघटना यासह महाराष्ट्रातून विविध संघटनेकडून गृहराज्य मंत्री तथा मा.मुख्यमंत्री यांना निवेदने देवून निषेध करण्यात आला आहे. ही घटना अत्यंत गंभीर असताना प्रशासनाकडून तपासाला गती देवून संबधित आरोपीला अटक केली जात नसल्याने सबंध राज्यातून नाभिक समाजासह इतर समाज व सर्व स्तरातून निषेध नोंदविला जात आहे. यामध्ये सांगोला आदर्श नाभिक सेवा मंडळाच्यावतीने

सर्व नाभिक समाज बांधवांनी शहर व तालुक्यातील आपली दुकाने बंद ठेवून सांगोला तहसिल कार्यालयाचे तहसिलदार व पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक यांना निवदेन देवून घटनेचा निषेध व्यक्त केला. सदर निवेदन देतेवेळी सांगोला शहर व तालुक्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget