पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार एबी डिव्हिलियर्स

AB
कराची – आता नव्या रुपात आणि नव्या वेशात क्रिकेटच्या मैदानात आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्स दिसणार आहे. पाकिस्तानात आयपीएलच्या धर्तीवर खेळल्या जाणाऱ्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) खेळण्याचा निर्णय डिव्हिलियर्सने घेतला आहे. पण या लीगमध्ये तो कोणत्या संघाकडून खेळणार हे स्पष्ट झाले नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून एबी डिव्हिलियर्सने २०१८ मध्ये निवृत्ती घेतली होती. त्याच्या निवृत्ती घेण्याच्या निर्णयामुळे लाखो क्रिकेटप्रेमींना चांगलाच धक्‍का बसला आहे. पण ‘डिव्हिलियर्स’ नावाच्या वादळाला आता परत एकदा खेळताना पाहण्याची संधी त्याच्या जगभरातील लाखो चाहत्यांना मिळणार आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget