स्विझर्लंड सरकार उभारणार श्रीदेवीची प्रतिमा

shree
स्वित्झर्लंड सरकार दिवंगत बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी हिच्या सन्मानार्थ तिची प्रतिमा उभारण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिर्देविच्या १९८९ मध्ये आलेल्या व अतिशय गाजलेल्या चांदनी या चित्रपटाचे शुटींग स्वित्झर्लंड मध्ये झाले होते आणि त्यामुळे स्वीत्झलंडला भेट देणाऱ्या भारतीय पर्यटकात चांगलीच वाढ झाली होती आणि पर्यायाने स्वित्झर्लंडच्या पर्यटन उद्योगात वाढ झाली होती.
स्विस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीदेवीच्या सुपरहिट चांदनी चित्रपटातील अनेक गाणी व प्रसंग येथे शूट झाले होते. त्यामुळे पर्यटन उद्योग चांगलाच वाढला. यामुळे श्रीदेवीची प्रतिमा उभी करून तिला सन्मान देण्याचा विचार केला जात आहे. यापूर्वी २०१६ मध्ये इंटरलेकेन शहरात चित्रपट निर्माते यश चोप्रा यांची प्रतिमा बसविले गेली आहे. यश चोप्रा यांनी चांदनी सह अनेक चित्रपटांचे शुटींग स्विझर्लंड मध्ये केले होते. यामुळे भारतीय पर्यटकात स्विझर्लंड लोकप्रिय झाले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget