आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य ऋषिकेश म्हेत्रे यांनी वाढदिवसाचा 



अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना केली मदत !  
सांगोला (प्रतिनिधी)
आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य ऋषिकेश म्हेत्रे यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पुणे येथे फर्ग्यूसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देवून आपुलकीचे दर्शन घडविले आहे.
सांगोला येथे गेल्या महिन्यात सुरु करण्यात आलेल्या ‘आपुलकी प्रतिष्ठान’चे सदस्य ऋषिकेश राजेंद्र म्हेत्रे यांचा 6 फेबु्रवारी रोजी वाढदिवस होता. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगळा उपक्रम राबवून  वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांनी आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयातील दोन गरीब व होतकरु अशा विद्यार्थ्यांना 5 हजार रुपयांची मदत 6 फेबु्रवारी रोजी सायंकाळी आपुलकीचे ज्येष्ठ सदस्य सुभाष लऊळकर सर यांच्याकडे सुपूर्त केली. 
यावेळी बोलताना सुभाष लऊळकर सर म्हणाले की, मानवी जीवन जगत असताना प्रत्येकाने सामाजिक भान जपणे गरजेचे असते. ऋषिकेश म्हेत्रे यांनी तरुण वयातच सामाजिक बांधिलकी जोपासून गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करुन एक चांगली सुरुवात केलेली आहे. ही सुरवात नक्कीच कौतुकास्पद अशी आहे. सामाजिक कार्यात तसेच गोरगरीब लोकांसाठी आपुलकी दाखविण्याचे कार्य आपुलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरु झाले आहे. अशा या चळवळीत सर्व स्तरातील लोकांनी  सहभागी व्हावे असे आवाहन केले. यावेळी ऋषिकेश म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त शाल, पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आपुलकीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

##आपुलकीची अशीही मदत - पुण्याच्या फर्ग्यूसन महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या दोन हुषार विद्यार्थ्यांच्या घरची परिस्थिती खूपच हलाखीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर आपलुकी प्रतिष्ठानच्या दहा सदस्यांनी एकत्र येवून प्रत्येकी 2500 रुपये दरमहा शैक्षणिक व इतर खर्चासाठी देण्याचा संकल्प केला असून 1 फेबु्रवारी पासून त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget