बाबर व लवटे परिवारांनी युवा पिढीला त्याग व समर्पणाचा नवा आदर्श  घालून दिला : प्राचार्य साजिकराव पाटील


 
 निजामपुर हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

 सांगोला प्रतिनिधी
 शिक्षण संस्था चालवताना येणाऱ्या असंख्य अडचणी आणि आव्हानांना तोंड देऊन निजामपूर सारख्या ग्रामीण भागात माळरानावर शिक्षण संस्था उभारून गेल्या अनेक वर्षांपासून आपले काम प्रामाणिकपणे आणि अविरतपणे पार पाडून संस्था अध्यक्ष गुलाबराव बाबर व संस्थेचे सचिव सुखदेव लवटे या दोन परिवारांनी आगामी पिढीसमोर त्याग आणि समर्पणाचा वेगळा आदर्श घालून दिला असल्याचे प्रतिपादन  श्रीमती काशीबाई नवले शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ साजीकराव पाटील यांनी केले. काल रविवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी निजामपुर तालुका सांगोला येथे राजे संभाजी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ संचलित निजामपुर हायस्कूल निजामपूर या प्रशालेच्या नूतन वास्तूचे विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा कै महादेवआबा लवटे फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉ पाटील बोलत होते 
 या कार्यक्रमासाठी शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस विठ्ठलराव शिंदे मा नगरसेवक प्रा संजय देशमुख जालना महापालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर सांगोल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने वैद्यकीय अधिकारी डॉ पियुष साळुंखे-पाटील सुप्रसिद्ध वक्ते माणिकराव पाटील माजी सरपंच संदिपान लवटे तानाजी लवटे हनमंतगावचे माजी सरपंच आप्पासाहेब खांडेकर यशवंत शिंदे प्रकाश बाबर धर्मराज बाबर पत्रकार किशोर म्हमाणे मिनाज खतीब सुरज लवटे निसार तांबोळी समीर पाटील आदींसह पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि निजामपुर गावातील पालक तसेच शिक्षणप्रेमी नागरिक व तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
 पुढे बोलताना डॉ पाटील म्हणाले कै महादेव आबा लवटे यांनी हयात असताना शाळेच्या बांधकामासाठी दिलेली सुमारे दोन एकर जागा त्यांच्या नंतरही लवटे कुटुंबीयांनी संस्थेला दिली ही बाब फार उल्लेखनीय आणि अभिमानाची आहे त्या पाठीमागील त्यांची त्यागाची व समर्पणाची भावना निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे याशिवाय संस्था स्थापन करून आजपर्यंत अध्यक्ष गुलाबराव बाबर यांनी ही अगदी निष्ठा आणि सचोटीने ग्रामीण भागात शिक्षणाचे बीज रोवले व खऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगा गावात दारोदारी पोहोचवण्याचे मोलाचे कार्य केले आहे बाबर व लवटे परिवारांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून अगदी एकदिलाने त्याग आणि समर्पण या भावनेतून जे काम केले आहे ते निश्चितच तरुणांसाठी आदर्शवत आहे यापासून तरुणांनी प्रेरणा घ्यावी असेही ते शेवटी म्हणाले 
 उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले शेकापचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव शिंदे यांनी या प्रशालेच्या पायाभरणी समारंभात पासून ते उद्घाटना पर्यंतच्या प्रवासाचा आपण साक्षीदार असल्याचे सांगत संस्था आणि प्रशालेतील शिक्षकांचे कौतुक केले त्याशिवाय त्यांनी नूतन इमारत उभा करत असताना ज्यांनी मदत केली त्यांनाही विशेष धन्यवाद देत ज्यावेळी या संस्थेचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी निश्‍चितच मदत करणाऱ्यांची नावे त्यामध्ये सुवर्णाक्षरांनी कोरली जातील असेही नमूद केले यावेळी संतोष खंडेकर इनामदार माणिकराव पाटील व विनायक कुलकर्णी आदि  वक्त्यांनी ही आपली मनोगते व्यक्त करताना कै महादेव आबा लवटे फाउंडेशन च्या कार्याचा गौरव करीत संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 यावेळी निजामपुर चे माजी सरपंच कै महादेव आबा लवटे यांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 11 मान्यवरांना कै महादेवआबा लवटे फाऊंडेशनच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये आदर्श सरपंच म्हणून अचकदाणी चे वसंतराव पाटील आदर्श माता म्हणून चांदबी अजीज इनामदार निजामपुर भूषण म्हणून उमेश कोळेकर ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे गुलाबराव पाटील सामाजिक क्षेत्रातून विनायक कुलकर्णी संजय बनसोडे यांना तर आदर्श शिक्षक म्हणून तानाजी पारसे रेवणसिद्ध कोकरे चंद्रकांत भोरे कालिदास मुंढे कैलास होवाळ व स्वाती नीलकंठ यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनचे अध्यक्ष सुखदेव लवटे यांनी सूत्रसंचालन विकास शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अण्णासाहेब गायकवाड यांनी केले
 काल रविवारी दिवसभर तीन सत्रात चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये पहिल्या सत्रात शास्त्रोक्त पूजा दुसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण व प्रशालेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन तर तिसर्‍या आणि शेवटच्या सत्रात प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला




 वडिलांच्या आदर्शाचा वारसा जोपासणार

 सार्वजनिक जीवनात कसे जगावे याचा आदर्श घालून देणाऱ्या कै महादेव आबा लवटे यांनी दाखविलेल्या मार्गावरून यापुढील काळातही मार्गक्रमण करून फाउंडेशनच्या माध्यमातून पुढील काळातही विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करणार
 सुखदेव लवटे अध्यक्ष कै महादेवआबा लवटे फाउंडेशन
 सचिव राजे संभाजी शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ निजामपूर


Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget