काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचा आज भारत बंद

congress
मुंबई – आज राष्ट्रव्यापी बंदचे पेट्रोल-डिझेलचे वाढते दर, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, विविध घोटाळे आदी मुद्द्यांवर आवाहन केले असून काँग्रेसचे प्रवक्ते अजय माकन याबाबत म्हणाले, या बंदमध्ये काँग्रेस आणि समान विचारसरणी असलेले २० इतर पक्ष सहभागी होणार आहेत. बंदला महाराष्ट्रातही अनेक पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांच्या निवास्थानातून ताब्यात घेतले आहे.
राजघाट येथे जाऊन महात्मा गांधींना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहून मोर्चाला सुरूवात केली. त्यांच्यासोबत काँग्रेसचे कोषाध्य़क्ष अहमद पटेल आणि पक्षाचे महासचिव मोतीलाल वोरा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते होते. राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी पक्षांचे नेते रामलीला मैदानावर पोहेचले आहेत. तसेच, वेगवेगळ्या राज्यांतून देखील बंद दरम्यान विरोध-प्रदर्शन सुरू आहे.
दरम्यान, मुंबईत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले की, नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे आंदोलन असल्यामुळे जनता, व्यापारी बांधवांचे, सार्वजनिक मालमत्तेचे कोणतेही नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची संपूर्ण दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget