पुन्हा एकदा मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार जम्बो !

anil-kumble
नवी दिल्ली – पुन्हा एकदा भारताचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे हा मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार असून तो आयपीलच्या संघाशी जोडला जाणार आहे. त्याचा आयपीएलच्या दिल्ली डेअरडेविल्स संघासबोत करार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याच्या संपर्कात दिल्ली संघ व्यवस्थापन असून लवकरच होणाऱ्या आयपीलच्या सीजनमध्ये कुंबळे पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतलेला दिसेल.
दिल्ली संघाची कामगिरी गतवर्षी आयपीलमध्ये सुमार कामगिरी झाली होती. आयपीएलच्या तालिकेत दिल्लीचा संघ शेवटच्या क्रमांकावर होता. रिकी पॉन्टिंग सोबत अनिल कुंबळे संघास मार्गदर्शन करेल. हे दोघेही यापूर्वी मुंबई इंडियन्सला मार्गदर्शन एकत्र करत होते. अनिल कुंबळेला प्रशिक्षक करण्यासाठी दिल्ली संघव्यवस्थापनाने शिफारस केली होती. कुंबळे संपर्कात असल्याचे दिल्लीचे संघव्यवस्थापक पार्थ जिंदाल यांनी सांगितले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget