अमित शहा यांच्याकडून उद्धव ठाकरेंना बंदमध्ये सहभागी न होण्यासाठी विनवणी

uddhav-thakre
मुंबई – भाजपध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करुन काँग्रेसकडून पुकारण्यात आलेल्या भारत बंद आंदोलनात शिवसेना सहभागी होऊ नये यासाठी विनवणी केल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना बंदमध्ये सहभागी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीमुळेच झाली नसल्याची सुत्रांची माहिती असून यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले आहे.
नेहमीच भाजपवर टीका करण्याची एक संधी न सोडणारी शिवसेना भाजपविरोधी आंदोलनात सहभागी सहभागी नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होता. शिवसेना बंदमध्ये सहभागी नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र बंदला पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून बंदवर भाष्य करताना जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये असेदेखील म्हटले आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget