गोविंदाच्या आगामी ‘फ्राय डे’चा ट्रेलर रिलीज!

govind
आगामी ‘फ्राय डे’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता गोविंदा बऱ्याच दिवसानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. गोविंदा आणि वरुण शर्मा यांच्या याच चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. यात या दोघांचे मजेशीर डायलॉग पाहण्यासारखे आहेत. ट्रेलरमध्ये गोविंदाची कॉमेडी हसून-हसून पोट दुखवेल अशी आहे. तसेच वरुण शर्माने एका अयशस्वी सेल्समनचे पात्र साकारले आहे. हा चित्रपट अभिषेक डोग्रा यांनी दिग्दर्शित केला आहे.

प्रदर्शित होता होता दोनदा हा चित्रपट पोस्टपोन्ड झाला होता. पहिल्यांदा ११ मे रोजी रिलीज होणार होता. पण त्याच तारखेला मेघना गुलजारचा ‘राझी’ हा चित्रपट रिलीज होत असल्यामुळे याचे रिलीज पुढे ढकलण्यात आले होते. त्यानंतर २५ मे रोजी रिलीजची तारीख, नंतर जूनमधली तिसरी तारीख जाहीर करण्यात आली. पण रिलीज पुढे ढकलण्यात आले होते. आता १२ ऑक्टोबर ही तारीख नक्की करण्यात आली आहे

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget